Thursday, December 22, 2011

नवे वर्ष... दारूच्या धुंदीत बुडवुन चंद्र
सिगारेटच्या धुरात फुंकून सूर्य
संगीताच्या तालावर थिरकणारे पाय
उजाडले तरी थकलेच नाय
त्यांना नवे काय अन जुने काय ?
वर्ष सरले? कळलेच नाय  

कॅलेंडर भिंतीवर
तारीख डोक्यावर
घड्याळ मानगुटीवर  
जुनी धुंदी उतरलीच नाय
नवे संकल्प? म्हणजे काय ?
तसेच दिवस
अन तशाच रात्री
नवे काय अन जुने काय ?
वर्ष सरले? कळलेच नाय


---BinaryBandya™    

9 comments:

aativas said...

नेमक बोट ठेवलं आहे तुम्ही!

Shriraj said...

नितांत सुंदर imagery!!!! :)

BinaryBandya™ said...

धन्यवाद मित्रानो ...

इंद्रधनु said...

agadi kharay....

प्रशांत said...

sahi

चैताली आहेर. said...

lai bharrri.... khup divasani tujhi kavita aali... ani ti pan ekdam thet...!! khup chhan re...!

BinaryBandya™ said...

प्रशांत ,इंद्रधनू , चैताली धन्यवाद ..

भानस said...

हाय काय आणि नाय काय !!

सविताशी सहमत... नेमक बोट ठेवलंस तू !

BinaryBandya™ said...

धन्यवाद भानस ..