Thursday, October 20, 2011

Personlized देव

व्यक्तिपरत्वे वेगळा देव,
जातीनुसार आगळा देव,
वेशीवर एक, अन गावात एक
गावकुसाबाहेरचा भोंगळा देव

आमचा तुमचा इतिहास एकच
तरीही माझा रंग आगळा
अन तुमचा रंग वेगळा 
आमचा आगळा पुतळा 
अन तुमचा वेगळा पुतळा

मीही मांडला इतिहासाचा बाजार
तुमच्यासारखाच, मला हवातसा
काही बेरजा अन काही वजाबाक्या
Personlized देव तयार हवातसा

---BinaryBandya™   

8 comments:

Anagha said...

मस्त !

rajiv said...

खरेय !! छानच लिहिलंय !! यावरून एक गोष्ट आठवली ..तुम्हा आम्हiला माहित असलेली. दृष्टीहीन असलेल्यांना हत्ती कसा जाणवला तर कुणाला तो सुपासारखा, कुणाला खांबासारखा, कुणाला दोरीसारखा ..तर कुणाला पाईप सारखा ... तसेय हे... आपण आपले डोळे उघडून कधी बघणार `देव' या संकल्पनेकडे.. ?

BinaryBandya™ said...

हो ना.
देव कधी कळणार आणि कधी शहाणे होणार आम्ही कोणास ठाऊक ...

सारिका said...

आपण आपले डोळे उघडून कधी बघणार `देव' या संकल्पनेकडे.. ?+1

chhaanch...!!!

Shriraj said...

सही यार... क्या बात है!

BinaryBandya™ said...

धन्यवाद सारिका
ब्लॉगवर स्वागत :)
धन्यवाद श्रीराज

चैताली आहेर. said...

mast avadali re...!! sahi concept ekdam...!!

BinaryBandya™ said...

धन्यवाद चैताली ...