Thursday, February 4, 2010

कधी कधी

कधी कधी नभालाही वाटत असेल
घ्यावे धरतीला मिठीत
कधी कधी ढगानाही वाटत असेल
शिरावे ह्या दरीच्या कुशीत

कधी कधी शिखरालाही वाटत असेल
खोल खोल दरीत उतरावे
अन कधी कधी दरीलाही वाटत असेल
उंचावरून जग पहावे

कधी कधी पावसालाही वाटत असेल
ओलेचिंब भिजावे
अन कधी कधी थंडीलाही वाटत असेल
उबदार गोधडीत शिरावे

कधी कधी उन्हालाही वाटत असेल
सर्वस्व सावलीला द्याव
अन सावल्यांनाही वाटत असेल
सोनसळी उन्हात नहाव ..

कधी कधी शब्दानांही वाटत असेल
कवितेला सजवावे
कधी कधी कवितेलाही वाटत असेल
शब्दांचेच होऊन जावे ...


---

9 comments:

रोहन... said...

मस्त आहे रे कविता... आवडली मला जाम...!! तू माझे सर्व ब्लोग्स इकडे लावले आहेस .. आज फिरता फिरता इकडे आलो आणि कळले. धन्यवाद...!!!

BinaryBandya™ said...

धन्यवाद...
तुझे blogs छान आहेत वाचायला आवडतात

-junkMind said...

mast re... :)

प्रशांत said...

khupach sundar kavita ahe...apratim....bandya rocks

Meenal Gadre. said...

क्लास आहे विरोधांचे एकत्रीकरण.
कधी कधी लेखकांना ही वाटत असेल
वाचक होऊन (आपलेच) लेख वाचावे.

BinaryBandya™ said...

विश, प्रशांत , उर्मी
धन्यवाद ....

Anagha said...

छान झालीय कविता ! :)

sandeep said...

chan ha maja ali

BinaryBandya™ said...

धन्यवाद संदीप