मेंदूने विणलेले कुठलेतरी सुरेख जाळे
स्वप्नांचे तुकडे,
विणलेल्या जाळ्याच्या छेदबिंदुवर विखुरलेले
माझे मन ,
ते तुकडे जमवून काहीतरी अर्थ काढू पाहणारे अन माझे जगणे,
पहाटेच्या सुंदर सुंदर स्वप्नात असे विखुरलेले
सुर्य ,
ते सुंदर जाळे विस्कटायला मुद्दाम लवकर उगवलेला
अन माझे मन ,
त्या तुकड्यांचा अर्थ लावता लावता रडकुंडीला आलेले
नेहमीचेच ठरलेले ,
सूर्याचा विजय अन माझी हार ..

हार नेहमीचीच ,
पण ती लगेच विसरून पण जातो
पण तुटक तुटक आठवणारी स्वप्ने मात्र
मनाला हुरहूर लावून जातात