Friday, October 1, 2010

सोबत

मी कधीच पावसात एकटा भिजलो नव्हतो 
तू सोबत असतानाही आणि हो आताही ..

सोबत असते मला आता ..
पावसाच्या अन तुझ्या प्रेमात पडलेल्या काही कवितांची  


सोबत असते मला आता ..
मनात जपलेल्या तुझ्या स्पर्शाची ...

सोबत असते मला आता ..
मनात जपलेल्या आठवणीतल्या पहिल्या पावसाची ...

आता फक्त सोबत असते तुझ्या आठवण थेंबांची,
अन पावसाच्या थेंबासोबत डोळ्यातील आसवांची ..

---BinaryBandya™

13 comments:

Anagha said...

आता फक्त सोबत असते तुझ्या आठवण थेंबांची,
अन पावसाच्या थेंबासोबत डोळ्यातील आसवांची...
हृदयस्पर्शी आहे...
:'(

BinaryBandya™ said...

:)

PIN@LL said...

खूप सही आहे छान आणि romantic -:P

BinaryBandya™ said...

Dhanyawad..

Sagar Kokne said...

कविता छान आहेत आणि ब्लॉग ही

Shriraj said...

अभी, उत्कट झालेय रे कविता आणि ही ओळ तर खासचः

"सोबत असते मला आता ..
पावसाच्या अन तुझ्या प्रेमात पडलेल्या काही कवितांची"

BinaryBandya™ said...

सागर , श्रीराज ..
धन्यवाद

इंद्रधनु™ said...

as always chan kavita aahe abhya!!!!

Anagha said...

पुढची कविता कधी येणारेय?? वाट बघतोय आम्ही सगळे! :)

BinaryBandya™ said...

लवकरच ...
लिहायला हुरूप मिळतो अशा commentsमुळे
Thanks ...

Raindrop said...

beautiful and so easy to understand :) am not very good at understanding marathi poetry but this one I understood and :(

thx for visiting dolchi...i saw ur comment only recently.

चैताली आहेर. said...

सोबत असते मला आता ..
पावसाच्या अन तुझ्या प्रेमात पडलेल्या काही कवितांची

....आर्त...हळवे शब्द....!!

BinaryBandya™ said...

@Raindrop ,चैताली
धन्यवाद ..