Saturday, August 20, 2011

आयुष्याची गणिते


सताड उघड्या डोळ्यांनी मी अंथरुणावर पडतो
अन दिवसाचा शिनवटा अंथरुणातच विरतो
मात्र उद्याची गणिते रात्री छतावर जागा शोधू लागतात
अन छतावर चिटकवलेल्या चांदण्या अंधुक होत जातात

चांदण्या साथीला असूनही मग मी भरकटतो
गणितांच्या जाळ्यात अलगद जाऊन अडकतो
एखादे सुटलेले गणित दुसऱ्याच गणितात अडकते
अन एक एक चांदणी छतावरून अलगद गळून पडते

शेवटी छतावर एखादीच चांदणी उरते
तेवढीच डोळ्यात घेऊन माझी रात्र सरते
बरं झालं छतावर मी सूर्य नाही चिटकवला
ह्या गणितांच्या ग्रहणात तोही असता अडकला

---BinaryBandya™   21 comments:

Anagha said...

WOW!!!!!! बंड्या ! खूपच सुंदर !!!!!!

BinaryBandya™ said...

पोस्ट केल्या केल्या कमेंट !!!
फार छान वाटले :)
धन्यवाद

Manali Satam said...

अप्रतिम ओळी आहेत... विशेषत: छतावर चांदण्या चिकटवण्याचा संदर्भ आवडला...

BinaryBandya™ said...

धन्यवाद मनाली ...

Lehmoon :) said...

Superb .... evn I have Stars over MY roof .... B-)

BinaryBandya™ said...

:) thanks

भानस said...

वाह! आवडली! :)

भानस said...

तुझा ईमेल देशील का जरा... तुझ्या प्रोफाईल मधल्या ईमेल वर जाण्याचा प्रयत्न केला पण... :(

BinaryBandya™ said...

धन्यवाद भानस :)

BinaryBandya™ said...
This comment has been removed by the author.
Unique Poet ! said...

अप्रतिम लिहीले आहेस ....!
फार सुंदर ...!

BinaryBandya™ said...

Unique Poet

धन्यवाद ..

Vishwesh said...

far bhari re abhya ...
fan zalo mi tuza ...

Vishwesh said...
This comment has been removed by the author.
Vishwesh said...

सताड उघड्या डोळ्यांनी मी अंथरुणावर पडतो
अन दिवसाच उरलेलं काम घेऊन अंथरुणातच विरतो
मात्र उद्याचे बग्स रात्री छतावर जागा शोधू लागतात
अन छतावर चिटकवलेल्या चांदण्या अंधुक होत जातात

चांदण्या साथीला असूनही मग मी भरकटतो
बग फिक्सच्या जाळ्यात अलगद जाऊन अडकतो
एखादि सुटलेली बग दुसऱ्या बग मध्ये अडकते
अन एक एक चांदणी छतावरून अलगद गळून पडते

शेवटी छतावर एखादीच चांदणी उरते
तेवढीच डोळ्यात घेऊन माझी रात्र सरते
बरं झालं छतावर मी सूर्य नाही चिटकवला
ह्या बग्सच्या ग्रहणात तोही असता अडकला

अन माझ्या कामाच्या क्वालिटी वर तो हि असता भडकला ...

चला कामाला लागा ...

BinaryBandya™ said...

dhanyawad..

BinaryBandya™ said...

tuzi kavita pan bharee ..

Shriraj said...

अप्रतिम अभि...निव्वळ अप्रतिम...आणखी काय बोलू... हे म्हणजे बऱ्याच जणांच्या मनातलच मांडलं आहेस तू... Thank you for sharing it with us!!!

BinaryBandya™ said...

धन्यवाद श्रीराज ..

इंद्रधनु™ said...

bandya farach mast re!!!

इंद्रधनु™ said...

bandya mastch re!!!!