Monday, April 4, 2011

फसवणूक

लहानपणी परीक्षेसाठी ,
तरुणपणी  नोकरीसाठी ,
कधी जोडले मी हात  
तुझ्यासमोर प्रेमासाठी    

तुझं हे मात्र नेहमीचंच,
ऐकून न ऐकल्यासारखे करायचे 
अन स्वतःचे देवपण विसरायचे 

पण आज काहीच न मागता जाणार
देवा आज तुला मी फसवून जाणार


आताही ह्याच विचारात असशीलच 
"आज हा काय मागणार ?"
पण आज कालच्यापेक्षा वेगळा आहे
आज माझा माज जरा वेगळा आहे
तुझ्यासमोर झोळी नाही पसरणार 
देवा आज तुला मी फसवून जाणार 

कितीही बसुदे चटके मी सोसेन 
कोसळू दे आभाळ ते मी तोलेन
मंदिरात मी तेंव्हा येईनही
नमस्कार मी घालेनही 
पण  ...
काहीही न मागता मी परत जाणार  
तेंव्हासुद्धा देवा तुला मी फसवून जाणार 


25 comments:

Lehmoon :) said...

एकदाच फस्वीन.... शेवटी....

BinaryBandya™ said...

:)
एवढे एकदम देवावर चिडू नको ..

Anagha said...

भारी!!!
:)

BinaryBandya™ said...

धन्यवाद अनघा ...

विनायक पंडित said...

सुपर्ब!:)

BinaryBandya™ said...

धन्यवाद विनायक आणि ब्लॉगवर स्वागत

Anuja Khaire said...

आपण देवाला खूप जवळचं मानतो म्हणून त्याच्यावर रागही व्यक्त करतोच नं! खूप छान!

BinaryBandya™ said...

हो नं!!
धन्यवाद अनुजा

Shriraj said...

सुंदर...खरंच ...मस्तच!!! :)

Suhas Diwakar Zele said...

खरंय... देवाकडे गाऱ्हाणी घालणारे आपण आणि त्याच्यावर रुसून बसणारे आपणच...
मस्त लिहिलंय !!

BinaryBandya™ said...

धन्यवाद सुहास ..

Anonymous said...

बाप रे!!! तू तर कायम कवितेतच बोलतोस!!! लय भारी!!! :P

BinaryBandya™ said...

धन्यवाद प्रिया आणि ब्लॉगवर स्वागत ..

प्रशांत said...

khup mast bandyaa

BinaryBandya™ said...

धन्यवाद प्रशांत

चैताली आहेर. said...

कितीही बसुदे चटके मी सोसेन
कोसळू दे आभाळ ते मी तोलेन
मंदिरात मी तेंव्हा येईनही
नमस्कार मी घालेनही
पण ...
काहीही न मागता मी परत जाणार
तेंव्हासुद्धा देवा तुला मी फसवून जाणार

hmmmm.... chhan vichar....
( bandya tu to 'bachchan' ban gaya...!!! :D) just kidding...
asach atmvishwas kayam jhalakude... !!

BinaryBandya™ said...

BinaryBandya चे बच्चनबंड्या करतो आता नाव ..
:)

इंद्रधनु™ said...

भारी!!!!

सारिका said...

मस्त लिहिलंय !! aavadesh!!

BinaryBandya™ said...

धन्यवाद सारिका...

Kreative soul said...

Are wah ! khuppp chan .

BinaryBandya™ said...

धन्यवाद ...

govinda said...

पराजय म्हणजे काय ते
शत्रु कडुन हारल्याशिवाय समजत नाही...........!!!!
दु:ख म्हणजे काय ते
अपेक्षाभंग झाल्याशिवाय समजत नाही........!!!!
सुख म्हणजे काय ते
स्वत: मध्ये शोधल्याशिवाय मिळत नाही.......!!!!
ओढ म्हणजे काय ते
जीव लावल्याशिवाय समजत नाही..........!!!!
विरह म्हणजे काय ते
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.........!!!!
प्रेम म्हणजे काय ते
... ... स्वत: केल्याशिवाय समजत नाही.........!!!!एवढे एकदम देवावर चिडू नको

BinaryBandya™ said...

कधी कधी येतो रे राग :(

Unknown said...

shevati dev to dev....apan tyavar ragavalo ky an n ragavalo ky...magital an n magital kay...to aplyala tyala hav tech an aplya yogya asen tech denar....