Saturday, December 11, 2010

माझी पहाट

स्वप्न ,
मेंदूने विणलेले कुठलेतरी सुरेख जाळे
स्वप्नांचे तुकडे, 
विणलेल्या जाळ्याच्या छेदबिंदुवर विखुरलेले 


माझे मन ,
ते तुकडे जमवून काहीतरी अर्थ काढू पाहणारे  अन माझे जगणे,
पहाटेच्या सुंदर सुंदर स्वप्नात असे विखुरलेले

सुर्य ,
ते सुंदर जाळे विस्कटायला मुद्दाम लवकर उगवलेला
अन माझे मन ,
त्या तुकड्यांचा अर्थ लावता लावता रडकुंडीला आलेले

नेहमीचेच ठरलेले ,
सूर्याचा विजय अन माझी हार ..
हार नेहमीचीच ,
पण ती लगेच विसरून पण जातो   

पण तुटक तुटक आठवणारी स्वप्ने मात्र
मनाला हुरहूर लावून जातात

9 comments:

Anuja Khaire said...

Great Words!!
माझे मन ,
ते तुकडे जमवून काहीतरी अर्थ काढू पाहणारे....

Anagha said...

'स्वप्न ,
मेंदूने विणलेले कुठलेतरी सुरेख जाळे
स्वप्नांचे तुकडे,
विणलेल्या जाळ्याच्या छेदबिंदुवर विखुरलेले'...
सुंदर आहे कल्पना...तिला स्वत:चे एक चित्र आहे....हलकेच तुटून जाणारे.

Shriraj said...

"सुर्य ,
ते सुंदर जाळे विस्कटायला मुद्दाम लवकर उगवलेला
अन माझे मन ,
त्या तुकड्यांचा अर्थ लावता लावता रडकुंडीला आलेले
"

काय मस्त कल्पना आहे रे!!!

BinaryBandya™ said...

अनुजा , अनघा , श्रीराज
..धन्यवाद

Unknown said...

sundar..

भानस said...

मानवी मनाच्या गूढतेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न आवडला.
बाकी ही स्वप्ने कधी कधी तुटलेली तार पुढल्या रात्री जुळवतातही... :)

BinaryBandya™ said...

धन्यवाद भानस ,
ब्लॉगवर तुमचे स्वागत ..

हो ना अन अशा तुटलेल्या तर जुळल्या की
पहाट एकदम सुंदर ...

kirti said...

खूप छान...

BinaryBandya™ said...

धन्यवाद किर्ती..
ब्लॉगवर तुमचे स्वागत