Tuesday, October 19, 2010

मिशीचा पिळ

आयुष्य म्हटले हा माणुस कधीच रडला नाही
नाहीच रडणार न झेपणारा राग कधीच गायला नाही

आयुष्य सजवले मी प्रेमाच्या फुलांनी
आयुष्यात प्रेमाचा मोगरा कधी फुलला नाही

जोडले मित्र जसे माळेमधे मणी
अजुनतरी एकही मणी निसटला नाही

कविता सजवल्या तिच्यासाठी प्रेमाच्या शब्दांनी
एकाही कवितेचा अर्थ तिला समजला नाही

आयुष्यभर गायली पावसाचीच गाणी
ह्रदयात दुष्काळ माझ्या कधीच टिकला नाही

कितीक घाव , कितीक दु:खे सोसली
माझ्यासाठी माझाच एकही शब्द रडला नाही

दैवानेही केले कित्येक वार अन घाव
असा कुठलाच घाव नव्हता जो सोसला नाही

हार-जीतची चिंताच नव्हती मनाला
खेळ असा मांडलाच नाही जो रंगला नाही

प्रश्न्च नव्हता कुणाचे पाय धराण्याचा
कुठल्याही दगडाला देव कधी मानला नाही

शेवटी यम म्हटला आता तरी रड की बाबा
काय करणार मिशीचा पिळ अजुन उतरला नाही


---BinaryBandya™

7 comments:

Shriraj said...

"शेवटी यम म्हटला आता तरी रड की बाबा
काय करणार मिशीचा पिळ अजुन उतरला नाही"

एकदम 'मराठी' कविता झालेय!!! :D

Anagha said...

नकोच उतरू दे तुझ्या 'मिशीचा पिळ',
उतरव तू त्या यमाच्या 'मिशीचा पिळ'!
:)

BinaryBandya™ said...

@श्रीराज : धन्यवाद
@ अनघा : नाहीच उतरणार ..
(त्यासाठी अगोदर मला मिश्या वाढवाव्या लागतील :P)

Dinesh D said...

कविता सजवल्या तिच्यासाठी प्रेमाच्या शब्दांनी
एकाही कवितेचा अर्थ तिला समजला नाही
Chan kavita. ayushyacha pravas mandalat aani tohi titkyach sopya ani saral shabdat- Dinesh D

PIN@LL said...

mastach chaan agadi sopya shabdat

Unknown said...

chhan ahe hi gazal..
khup awadali..

BinaryBandya™ said...

@दिनेश , Pinall ,योग : धन्यवाद