सताड उघड्या डोळ्यांनी मी अंथरुणावर पडतो
अन दिवसाचा शिनवटा अंथरुणातच विरतो
मात्र उद्याची गणिते रात्री छतावर जागा शोधू लागतात
अन छतावर चिटकवलेल्या चांदण्या अंधुक होत जातात
चांदण्या साथीला असूनही मग मी भरकटतो
गणितांच्या जाळ्यात अलगद जाऊन अडकतो एखादे सुटलेले गणित दुसऱ्याच गणितात अडकते
अन एक एक चांदणी छतावरून अलगद गळून पडते
शेवटी छतावर एखादीच चांदणी उरते
तेवढीच डोळ्यात घेऊन माझी रात्र सरते
बरं झालं छतावर मी सूर्य नाही चिटकवला
ह्या गणितांच्या ग्रहणात तोही असता अडकला
---BinaryBandya™