Monday, June 6, 2011

भिजलेला सूर्य

उन्हाळाभर मानगुटीवर बसलेला सूर्य
चार महिने नको तेवढा तापला
कालच्या पावसासोबत मात्र 
विरघळत विरघळत मातीत मिसळला

इथेतिथे साचलेल्या पाण्यात मग,
पावसानंतर का होईना
पण लहान मुलांसारखाच चिंब भिजला

मावळतीला बुडता बुडता मग,
ढगांच्या दुलईत
लहान मुलांसारखाच निजला


नुकताच पाउस पडून गेला होता. बाहेर फेरफटका मारावा म्हणून थंड हवेत फिरायला आलो.
पण थोड्याच वेळात सूर्य महाराज ढगातून बाहेर येऊन दर्शन देऊ लागले.
बिचारा रस्त्यावर साठलेल्या पाण्याच्या डबक्यात स्वतःला बघत बसला होता.
वाटले मागची ४ महिने नुसता मानगुटीवर बसून होतास, घामाने भिजवत होतास.
आता बघ कसं तुझं अगदी पिल्लू झालंय यार ...
त्या पाण्यात उडी मारायचा मोह मी टाळलाच. अन मनातल्या मनात म्हटले
"खेळ बाबा  तुही पाण्यात , तुलाही कधी कधी लागतच असेल की तहान"


---BinaryBandya™ 

18 comments:

Anagha said...

मस्त ! खूप छान ! :)

भानस said...

खुशाळलेला सूर्य डोळ्यासमोर तरळला. :)

सहीच!

Unknown said...

क्या बात है !!!

BinaryBandya™ said...

अनघा , भानस , राज
धन्यवाद :)

Lehmoon :) said...

सूर्य डोईवर जळणारा .... चांद राती झगमगणारा .... Mastach re ....

Unique Poet ! said...

सुंदर ..... क्या बात है ! :)

इंद्रधनु™ said...

खूप खूप खूप खूप सही!!!!

Shriraj said...

"उन्हाळाभर मानगुटीवर बसलेला सूर्य
चार महिने नको तेवढा तापला
कालच्या पावसासोबत मात्र
विरघळत विरघळत मातीत मिसळला"

कवी महाराज!! क्या बात है!!!

BinaryBandya™ said...

Lehmoon , Unique Poet ! , इंद्रधनू , श्रीराज
धन्यवाद :)

चैताली आहेर. said...

khup goad kavita... suryala asa enjoy karatana baghayla khup avadla... kay pan bhannat kalpana tujhi...!!!

BinaryBandya™ said...

@चैताली: आभार :)

Ketaki Kulkarni said...

Too good Bandy! :)

BinaryBandya™ said...

धन्यवाद केतकी

Snehal deshmukh said...

मस्त आहे कविता....

BinaryBandya™ said...

धन्यवाद स्नेहल
आणि ब्लॉगवर स्वागत

Anonymous said...

मस्तच भाऊ ...!!!

BinaryBandya™ said...

धन्यवाद दवबिंदू :)

प्रशांत said...

sahich