Saturday, December 25, 2010

माझे खोलपण असेच उथळ उथळ

 
माझ्यात खोलवर पोहचायचे
सगळेच दरवाजे बंद,
सगळ्याच वाटा बंद,
पण माझा कोश आणि मी
दोघेही वाट बघतोय,
माझ्या माणसांची ...
  
तुम्हाला सापडेल अशी 
एखादी चोरवाट,
अतिशय खोल जाणारी
अगदी माझ्यातल्या "मी" पर्यंत...
 
पण हो मनापासून
मला भेटायची ओढ,
माझ्यापर्यंत पोहोचायची 
इच्छा असणाऱ्यासाठीच,
अशा चोरवाटा,
"जाणून बुजून ठेवलेल्या चोरवाटा !!!" 

वरून जरी वाटत असेल "मी" उथळ 
पण माझ्या तळाशी पोहोचणे तेवढेच कठीण 
कारण माझे खोलपण असेच फसवे 
अन उथळ उथळ...
 
 

25 comments:

Anagha said...

आधी मला सांग असा पाठ फिरवून का बसलायस??!! ही इथे पाठी लांब रांग लावली आम्हीं!! पण तू मुळी बघतच नाहीयेस वळून! :(
ह्याला म्हणतात चोराच्या..... :)

Deepak Parulekar said...

अनघाशी एकदम सहमत रे !
बाकी शब्द सहीच आहेत !

प्रशांत said...

chorvaat faqta tichya sathi ahe ka???

tujhyatala "tu" amhala nakki kalalaay re...vaata matra amhi amachya shodhalyat...

BinaryBandya™ said...

धन्यवाद
स्वभावाला औषध नाही
त्यामुळेच उलटा बसलोय ..

PIN@LL said...

khup chaan... :)
उथळ पण माझ्या तळाशी पोहोचणे तेवढेच कठीण कारण माझे खोलपण असेच फसवे अन उथळ उथळ..

Yogesh said...

मस्त..मस्त..मस्त...आवड्या..

Anagha said...

भट्टी चांगली जमलीय हे बोलायचं त्या दिवशी राहूनच गेलं! त्याबद्दल माफी! :)

BinaryBandya™ said...

@योगेश : ब्लॉगवर स्वागत आणि धन्यवाद
@अनघा : धन्यवाद , तुम्ही कविता वाचली ह्यातच सगळे आले ..
माफी उगाच कशाला :)

Ketaki Kulkarni said...

Bandy, तुला पाठ फिरवून बसायचं असेल तर हरकत नाहीये, आम्ही तुझ्या समोर येऊन बसतो... मग तर झालं? मग तर हसशील ना?

खूप छान आहे कविता! :)

BinaryBandya™ said...

:)
तेच तर पाहिजे मला ..

Manali Satam said...

खूप सुंदर.... प्रत्येक शब्दन शब्द खूप काही सांगून जातो!!!

BinaryBandya™ said...

धन्यवाद मनाली
ब्लॉग वर तुमचे स्वागत ..

Shriraj said...

अभि, तुझ्या ब्लॉगच्या नावाला अनुसरून झालेय कविता अगदी...सहीये...आवडली :)

ह्यावेळी जरा उशीरच झाला इथे यायला... हो ना?

BinaryBandya™ said...

धन्यवाद ...
आलास तेच महत्वाचे आहे ... :)

Anagha said...

प्रिय मित्रा, नूतन वर्ष तुला आणि तुझ्या सर्व जवळच्या मंडळींना सुखसमाधानाचे व भरभराटीचे जाओ! आणि अश्याच छान छान कविता करत जा हं..आम्ही आहोतच वाचायला! आणि एकदा इथे वळून बघ पाहू जरा! :) :)

BinaryBandya™ said...

@अनघा : धन्यवाद :)
तुम्हाला नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ..
मागे वळून बघू ना पुढच्या वर्षी ..


सर्वांनाच नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ..

श्रिया (मोनिका रेगे) said...

सर्व प्रथम नूतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
कविता सहीच आहे,साध्या शब्दात बरंच काही सांगते आहे.तू छान बोलतोस कवितेतून! असाच बोलत रहा.....लिहित रहा.

BinaryBandya™ said...

श्रिया तुम्हालाही नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ..
आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ...

saurabh V said...

छान ..... पण हे वाचून मला इथेही महाराजांची आठवण आली - आज्ञापत्रासारखं आहे हे -

"किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे, याकरिंता गड पाहून, एक दोन तिन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यामध्यें हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या."

"गडास यावयाचे मार्ग असतील ते सुगम नसावे. सुगम असले तर ते मार्ग मोडून, तावर झादी वाढवून आणखीकडे परके फौजेस येतां कठीण असे मार्ग घालावे."

:-D :-D

असो,
कविता आवडली. :-)

Madhuri's said...

खूप छान !!!

Anuja Khaire said...

खूप खोल!
Amazing!!
चोरवाट,अतिशय खोल जाणारी अगदी माझ्यातल्या "मी" पर्यंत.....

BinaryBandya™ said...

धन्यवाद अनुजा ..

इंद्रधनु™ said...

Bandya, manatal lihilas re!!!!!
far far far aawadal.

Unknown said...

Lovely Bandya:):) mast lihili aahe....

Unknown said...

Lovely Bandya:):) mast lihili aahe....