Thursday, February 17, 2011

तरीही लिहा..

कागद म्हणतो लिहा ,
लेखणी म्हणते लिहा,
दौतीतली शाई म्हणे
लिहा लिहा अन लिहा

काळजातल्या तक्रारी
फुंकर मागतात,
अंधारातले कोपरे 
उजेड मागतात,
मग,
लिहा लिहा अन लिहा

अवघडलेले शब्द
वाटा मागतात,
नेहमीच्या वाटा
बदल मागतात,
मग,
लिहा लिहा अन लिहा.


मन म्हणते मला सुचत नाही,
गाणे म्हणते तुला जमत नाही,
कोणी म्हणे ताल नाही,
कोणी म्हणे चाल नाही,
तरीही,
लिहा लिहा अन लिहा. 


---BinaryBandya™

15 comments:

Anagha said...

:)

असं लिहा तसं लिहा...
पण लिहा लिहा लिहा...!!

कारण तुम्ही कसंही लिहिले तरी...
छानच लिहिता!

बंड्या, मला खूप आवडलं! :)

कविता तुमच्यासाठी said...

प्रकाश १११
एकदम झकास !मस्त!!अगदी मनापासून !!!

BinaryBandya™ said...

धन्यवाद अनघा :)
@प्रकाश : ब्लॉगवर तुमचे स्वागत आणि धन्यवाद ..

Yogesh said...

लय भारी...आवडली... :)

भानस said...

अवघडलेले शब्द
वाटा मागतात,
नेहमीच्या वाटा
बदल मागतात,

सहीच! ही आवर्तन सदाचीच. गरजेची...

आवडली!

BinaryBandya™ said...

योगेश , भानस : धन्यवाद .

इंद्रधनु said...

वाह.. फारच छान......

तुम्ही खरंच नेहमी लिहा....... :)

Sagar Kokne said...

मस्त...

BinaryBandya™ said...

सागर धन्यवाद ,
इंद्रधनू : धन्यवाद ..
नक्कीच नेहमी लिहित जाईन..

Lehmoon :) said...

Me tula sarkha tech sangate ki nahi.... Tu fakta lihi re Job nahi kela tari chalel pan lihit ja :)

BinaryBandya™ said...

:)

Anuja Khaire said...

अवघडलेले शब्द
वाटा मागतात, .....Great!!

BinaryBandya™ said...

धन्यवाद अनुजा ..

Shriraj said...

अनघाशी १००% सहमत. तू जे काही लिहितोस ते सुंदरच वाटते.

BinaryBandya™ said...

धन्यवाद श्रीराज ..
लिहिण्यासाठी हुरूप येतो तुमच्यामुळे :) ..