Monday, November 1, 2010

वाट हरवलेल्या काही कविता

माझ्या वहीवरल्या 
अर्ध्यातच वाट हरवलेल्या काही कविता,
कधी कधी भांडण उकरून काढतात माझ्याशी ...


तुझ्यामुळेच आम्ही हरवलो,
आता कळत नाहीये...
जायचे कुठे  ? अन थांबायचे कुठे ?


त्यांची समजूत घालण्याकरता मग,
मी शोधतो अजून एखादी ओळ ..

अन त्यांना मुक्कामाला पोहोचावायाच्या नादात मात्र ,
मी स्वतःच हरवतो ...


---BinaryBandya™

10 comments:

Sagar Kokne said...

सुंदर...माझ्या बाबतीतही असेच काहीसे

BinaryBandya™ said...

:)

अनघा said...

मग 'कविता' आणि तू पुन्हा कधी एकमेकांना सापडता? त्याची आम्ही इथे वाट सारखी बघत असतो! :)
छान झालीय कविता! :)

BinaryBandya™ said...

बऱ्याच प्रयत्नानंतर आम्ही एकमेकांना गाठतो की कागदावर ...
आणि कागदावरून इकडे ब्लॉगवर ...

धन्यवाद ...

rajiv said...

अन त्यांना मुक्कामाला पोहोचावायाच्या नादात मात्र ,
मी स्वतःच हरवतो ...

आणि मग त्याच बिचाऱ्या येतात तुला शोधत घेऊन मागणे..!
आणी मागतात उद्याच्या प्रकाशातले एक सजीव फुलणे ....!!

श्रीराज said...

Abhijit, hey asa bhabda lihun tu nehmi jinktos amhala :)

BinaryBandya™ said...

@rajiv faar chhan
@shreeraj :dhanyawad ...

चैताली आहेर. said...

माझ्या वहीवरल्या
अर्ध्यातच वाट हरवलेल्या काही कविता,

सुरवातच लई भारी......!!
अगदी सहज कविता.....

BinaryBandya™ said...

धन्यवाद चैताली

इंद्रधनु... said...

apratim.
baryach divasani tuza blog ughadala aani man ekdum prasanna zala bandya. solid vatal :)