माझे एकटेपण अन माझा वेडेपणा
सोडले तर माझे असे काहीच नाही,
अन तू म्हणतेस वेडेपणा सोड
त्यापेक्षा जगायचे सोड म्हण ना..
---BinaryBandya™
Friday, November 26, 2010
Monday, November 22, 2010
मागच्या जन्मीचे मावळे
@जीवधन |
प्रत्येक गडावर असा एखादा तरी मित्र भेटतोच ...
हा मित्र मला जीवधन गडावर भेटला .
गड चढताना, उतरताना ते तुम्हाला साथ करत असतात .
बहुतेक मागच्या जन्मीचे मावळे असावेत ..
राजांकडून वरदान मागून घेतले असावे त्यांनी "प्रत्येक जन्मात गडाची सेवा घडावी आमच्या हातून.."
@तोरणा |
नशीबवान ते मावळे ...
ज्यांना राजे पहायला , त्यांच्या सहवासात राहायला मिळाले अन स्वराज्यासाठी लढायला मिळाले ...
---BinaryBandya™
Monday, November 1, 2010
वाट हरवलेल्या काही कविता
माझ्या वहीवरल्या
अर्ध्यातच वाट हरवलेल्या काही कविता,
कधी कधी भांडण उकरून काढतात माझ्याशी ...
तुझ्यामुळेच आम्ही हरवलो,
तुझ्यामुळेच आम्ही हरवलो,
आता कळत नाहीये...
जायचे कुठे ? अन थांबायचे कुठे ?
त्यांची समजूत घालण्याकरता मग,
मी शोधतो अजून एखादी ओळ ..अन त्यांना मुक्कामाला पोहोचावायाच्या नादात मात्र ,
मी स्वतःच हरवतो ...
---BinaryBandya™
Subscribe to:
Posts (Atom)