एक प्रेम तुझे नि माझे
म्हटलं तर सगळ्यांसारखेच
अन म्हटलं तर जगावेगळे
एक खेळ भातुकलीचा तुझा नी माझा
म्हटलं तर सगळ्यांसारखाच
अन म्हटलं तर जगावेगळा
काही शब्द तुझ्या ओठांवरले गुलाबी अन बेधुंद
काही शब्द माझ्या मनातले प्रेमळ अन निश्चल
काही आपल्या नात्यासारखे नाजूक अन हळुवार
अशी ही तुझी-माझी आपली कविता
म्हटलं तर सगळ्यांसारखी
अन म्हटलं तर जगावेगळी
---BinaryBandya™
5 comments:
Chaan aahe... :)
प्रत्येकाला स्वत:चं प्रेम वेगळंच वाटतं. तुम्ही ते शब्दात छान उतरवलंय. कविता छान आहे.
मैथिली,वैभव
धन्यवाद
म्हटलं तर.......... मस्त आहे ........
dhanywad YogeshWar..
Post a Comment