समोर तू आलीस की जगापासुनच तुटतो ,
कुठेतरी दुर समुद्रात एकटाच भरकटतो,
शप्पथ, समोर तू आलीस की मी मोहरतो...
समोर तु आलीस की
मी माझ्या शब्दांचा बहार पण बघितलाय...
अन समोर तु आलीस की
मी माझ्या कवितेचा जळफळाटही बघितलाय...
समोर तु अन माझे डोळे फितूर
समोर तु अन माझे श्वास फितूर
समोर तु अन हृदयाची धडधड फितूर
समोर तु अन साला माझे मन पण फितूर...
स्वत:चे काय असे उरलय,
मनात वेगळच काहीतरी भरलय,
किती, कशाला अन का आवरु,
माझ्यातला मीच तुला फितूर...
---BinaryBandya™
10 comments:
समोर तु अन माझे डोळे फितूर
समोर तु अन माझे श्वास फितूर
समोर तु अन हृदयाची धडधड फितूर
समोर तु अन साला माझे मन पण फितूर...
ultimate...
माझ्यातला मीच तुला फितूर...
sahi re!!
ekdum mast!!!
खूप छान! :)
Kup Chhan aahet blogs
shabd nahi bolayla
सहीच!मस्त वाटले वाचून!
धन्यवाद श्रिया ..
ब्लॉगवर तुमचे स्वागत ..
Saglyattt masttt vatali hi kavita!!!
धन्यवाद ..
Post a Comment