Thursday, April 22, 2010

दमलेले ढग

परवा माझ्या दारावर आला एक तहानलेला ढग 
उन्हामुळे रापलेला,
तहानेने व्याकुळलेला,
कापसाचा गोळा म्हणावे असे तर त्याच्याकडे काहीच नाही,
अन पाउस ह्याच्याकडेच लपला असावा असे तर मुळीच नाही...

मी त्याला पाणी दिले अन विचारले
इतका का धावतो आहेस ?
असे काय लपवतो आहेस ?

तो बोलला विमान मागे लागले आहे ..
पाउस शोधणारे ...
पाउस मागणारे ...

मी ठरवणार, मी कुठे बरसायचे ?
कुणाला तरसवायचे !!!
म्हणून धावतोय ...
मी धावतोय माझ्या स्वातंत्र्यासाठी.. 
ज्यांनी निसर्गावर प्रेम केले,
धरती अन आकाशावर प्रेम केले
त्यांच्यासाठी ...

---

14 comments:

Dnyana said...

वा वा यंदा पाउस नक्की जोरदार पडणार...

sonu said...

hey really very nice...khup ch chhan aahe...

yog said...

mastach

Rashmi said...

Sarvach Kavita apratim aahet...

Binary Bandya said...

sonu,yog,Rashmi
धन्यवाद ..

Maithili said...

Khoop chaan...

Sandeep said...

gr8 one .... aaawadla ...

Gangadhar Mute said...

सुरेख कविता.ar

अनघा said...

:) nice!

Kreative soul said...

पावसाच्या कविता वाचन एक सुखद अनुभव असतो .
आवडली !

BinaryBandya™ said...

@Kreative soul :
धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत

चैताली आहेर. said...

are hi kashi kaay vachali nahi mi.....

tya dhhagasarakhich aart ani vyakul ahe kavita.... just luvvved it....!!

BinaryBandya™ said...

फार जुनी आहे म्हणून कदाचित ..
धन्यवाद चैताली :)

Lehmoon :) said...

Tuza Maan tuzya Kavitan madun saral saral kalun yeta .... kitti sundar ahe te :)