Saturday, April 17, 2010

वीज पडून वठलेले एक झाड

वीज पडून वठलेले एक झाड ,
विजेच्या आघाताने आयुष्याची राख झालेले झाड ..
पावसाळा संपला  , हिवाळा संपला  ,
उन्हाळाही जाळून निघून गेला ..

पण परत येणाऱ्या पावसाळ्यात ...
गडगडणार्‍या ढगांच्या , कडाडणार्‍या विजांच्या
बरसणार्‍या पावसाच्या गावी नसेलही हे झाड ..पण पुन्हा उभे आहे, डोंगराएवढे मन घेऊन हे झाड
पण पुन्हा उभे आहे, पोलादी छाती घेऊन हे झाड

अन मनातल्या मनात म्हणत असेल  -
"बघू आता परत कुठल्या विजेच्या प्रेमात जळणं होतंय"

5 comments:

yog said...

solid lihiley.. photo pan mast ahe

Binary Bandya said...

dhanyawad...

Shirish Jambhorkar said...

Asankhya vyatha vyakt kelya aahes ...

Pinall said...

तुझे विचार भरपूर काही सांगता आहेत.... खोल विचार केला तर आपणच गुंतत जातो आपल्याच विचारात अस लिहल आहे...
"तेच झाड त्या विजेच्या प्रेमात पडत जी वीज पावसात येते आणि त्या पावसानेच ते झाड मोहरत आणि परत त्या विजेनेच संपत..." हा माझा विचार जो मला सुचला वाचून. खरच छान लीहल आहेस कल्पना तर अप्रतिम.

BinaryBandya™ said...

@Pinall :
धन्यवाद . वेळ काढून माझा ब्लोग वाचल्याबद्दल ...