Thursday, August 5, 2010

मावळतीला स्वत:साठी रंग शोधणारा ढग मी ..

पावसाळ्यात इंद्रधनुसवे रंगणारा पावसाचा  थेंब मी
अन कधी कधी सात रंगाशी नाते जोडणारा इंद्रधनू मी

माझ्या पंखांसाठी फुलांचा रंग वेचणारे फुलपाखरू मी
अन कधी रंगासाठी आसुसलेला रंगपेटीतला कुंचला मी

तुझ्या डोळ्यात माझ्या स्वप्नांसाठी रंग शोधणारा वेडा मी
अन कधी उन्हाळ्यात उन्हासवेच रंगणारा प्रियकर गुलमोहर मी

कधी पहाटेला सूर्यासवे भगव्यात रंगणारा शुक्रतारा मी
अन कधी मावळतीला स्वत:साठी रंग शोधणारा ढग मी

 ---BinaryBandya™

7 comments:

प्रशांत शंकर ठाकुर said...

तुझ्या कवितांचा दर्जा दिवसेंदिवस वाढत चालला आहे ... आणि माझी हि कविता वाचनाची आवड वाढत चालली आहे....
इतक्या सुंदर कविता आम्हा रसिकांस वाचण्यास उपलब्द केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

yog said...

ekdaum sahi re..!!
ani Thakur manhale te agdi khar..

BinaryBandya™ said...

प्रशांत , योग ..धन्यवाद
तुमच्या अश्या comments मुळे लिहिण्याचा हुरूप वाढतो ...
असाच लोभ असावा :) ..

संगमनाथ खराडे said...

Mast aahe kavita

अनघा said...

मला ना तू हे लिहीलयस ना... माझ्या हृदयावर ना आहे एक नकाशा ... 'त्यावरचे बरेचसे रस्ते अजून कधी वापरलेलेच नाहीयेत...' ते संपूर्ण खूप आवडतं. खूप छान आहे. अगदी मस्त फुलांनी डवरलेल्या एखाद्या अनोळखी पाऊलवाटेवरून हलकेच तरंगत जातोय असं मला वाटतं! :)

BinaryBandya™ said...

@अनघा : धन्यवाद ..

चैताली आहेर. said...

<<>>

अरे काय शब्द आहेत.... just luvved it....!!