Tuesday, September 29, 2009

मुजरा


स्वयंभु मी, मुजरा घालत कुणाच्या सदरेत नाही
वगळले मलाच, नाव माझे कुठल्याच बखरेत नाही

हरहुन्नरी मी, बिलंदर होउन जगलो
पण खासा कुणाच्या भरलो नजरेत नाही

सगळे दिवस काळ्या आमावस्याच
माझा चंद्र अजुन माझ्या नजरेत नाही

सगळ्या वरवरच्या मलमपट्या
अंतरीच्या तारा छेडणारी नशा मदिरेत नाही

सजावट एकमेकांना भुलवण्यासाठीच
गणेशास बांधेल ती भक्ती कुठल्याच मखरेत नाही


---

4 comments:

Shirish Jambhorkar said...

कविता तुझी दाद द्यावी अशीच जरी...
अशी दाद अद्याप कुठल्या शब्द कोषात नाही

क्रांति said...

kavita jabardast!

BinaryBandya™ said...

धन्यवाद क्रांन्ति
धन्यवाद शिरीष

Prashant S. Thakur said...

mast ahe...
-PT