Monday, August 17, 2009

मी एक सिग्नल पिवळा

न तांबडा न हिरवा , मी एक सिग्नल पिवळा
कायम गोंधळलेला ,मी एक सिग्नल पिवळा

तांबड्यापेक्षा कमी अन हिरव्यापेक्षा जास्त
स्वत:ची किम्मतच माहीत नसलेला ,मी एक सिग्नल पिवळा

कुणी पाळला , कुणी तोडला
कुणी स्वत: माझ्यासारखाच गोंधळलेला, मी एक सिग्नल पिवळा

माझे सांगणे काहीच नाही , तसेही ऐकायला कोणीच नाही
गर्दीत असुनही नसलेला , मी एक सिग्नल पिवळा

मला द्यायचे काही नाही , आणि घ्यायचे काही नाही
सगळ्यांशी संबध तोडलेला , मी एक सिग्नल पिवळा

भारत जिंकला , भारत हरला , कुणी जगला , कुणी मेला
कशाचे सोयर-सुतक नसलेला , मी एक सिग्नल पिवळा

माझ्याकडे प्रेमही नाही आणि द्वेषही नाही
भावनांचा सागर आटलेला , मी एक सिग्नल पिवळा

असेच का ? अन तसेच का ?
स्वता:चे ठाम मत नसलेला ,मी एक सिग्नल पिवळा

जीव आहे म्हणुन जगतो , का जगतो म्हणुन मरणार
माझ्या मरणाशीही घेणे-देणे नसलेला , मी एक सिग्नल पिवळा


---

8 comments:

साधक said...

Good Concept !

सागर said...

chan aahe ........

Unknown said...

आयला तु एकदम अफलातून आहेस....
कसं सुचलं तुला हे कळत नाय....
पण बरोबर आहे रे...
आपण सगळेच असतो रे असे कधी लाल,हीरवे आणि पिवळे..
पण तु नेहेमीच का रे बाबा पिवळा?
कंटाळला असशील सध्या...होय ना?
होशील नंतर गार हिरवा.....

Yawning Dog said...

bharee aahe !

Prashant S. Thakur said...

Bandyaaa..... nehami pramanech kavita keliyes agadi pratekachya manala bhidanaari......

Zakkas...

BinaryBandya™ said...

साधक ,सागर ,lala , Yawning Dog

धन्यवाद

Kreative soul said...

तांबडा असो वा पिवळा !
तू जाणवून दिलेस रंग तुझा वेगळा!!

nice concept!:)

BinaryBandya™ said...

@Kreative soul :
आभार